अ‍ॅपशहर

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्या!

रेल्वे मंत्रालय, एसटी महामंडळ, मुंबई पालिकेप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांनाही दिवाळीसाठी बोनस देण्याची मागणी पुढे आली आहे. बेस्टच्या अर्थसंकल्पात सानुग्रह अनुदानासाठी (बोनस) कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. पण, दिवाळीचे औचित्य लक्षात घेऊन प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करावा, अशी मागणी मंगळवारच्या बेस्ट समिती बैठकीत करण्यात आली.

Maharashtra Times 24 Oct 2018, 1:38 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai bonus demand for bmc best employees
मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्या!

रेल्वे मंत्रालय, एसटी महामंडळ, मुंबई पालिकेप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांनाही दिवाळीसाठी बोनस देण्याची मागणी पुढे आली आहे. बेस्टच्या अर्थसंकल्पात सानुग्रह अनुदानासाठी (बोनस) कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. पण, दिवाळीचे औचित्य लक्षात घेऊन प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करावा, अशी मागणी मंगळवारच्या बेस्ट समिती बैठकीत करण्यात आली.

बेस्ट उपक्रमाने उचलच्या रूपात ५,५०० रुपये बोनस म्हणून जाहीर केले होते. त्यानुसार ही रक्कम समान ११ हप्त्यांमध्ये कापून घेण्यात आली. त्यासाठी उपक्रमाच्या कामगिरीचा निकष ठेवण्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या दिवाळीबाबत उचल न देता बोनस देण्याची मागणी मंगळवारच्या बेस्ट समिती बैठकीत शिवसेनेचे सदस्य सुहास सामंत यांनी केली. बोनसप्रमाणेच यंदाच्या दिवाळीत गतवर्षी कापून घेण्यात आलेली ५,५०० रुपयांची रक्कमही परत देण्याची मागणी भाजप सदस्य श्रीकांत कवठणकर यांनी केली आहे.

मुंबई पालिकेत शिवसेना सत्तास्थानी असूनही बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी सतत मागणी करावी लागते. ही बाब योग्य नसून कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे, असे मत मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मांडले. दिवाळी लक्षात घेऊन १० तारखेच्या आतच बोनस आणि वेतन देण्याविषयी काँग्रेसचे सदस्य भूषण पाटील यांनी आग्रही मागणी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज