अ‍ॅपशहर

‘पंजाच्या वाट्याला जाऊ नका’

शिवसेना हा वाघाचा पक्ष आहे. वाघाच्या पंजामध्ये ताकद असते. त्यामुळे या पंजाला आव्हान देण्याचा कोणी प्रयत्न करू नये. ज्यांनी ज्यांनी पंजाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला ते आतापर्यंत आडवे झाले, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

Maharashtra Times 19 Jun 2016, 12:39 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai book publication vaghache panje uddhav thackeray
‘पंजाच्या वाट्याला जाऊ नका’


शिवसेना हा वाघाचा पक्ष आहे. वाघाच्या पंजामध्ये ताकद असते. त्यामुळे या पंजाला आव्हान देण्याचा कोणी प्रयत्न करू नये. ज्यांनी ज्यांनी पंजाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला ते आतापर्यंत आडवे झाले, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. कॅनडास्थित मराठी उद्योजक विजय ढवळे यांनी लिहिलेल्या ‘वाघाचे पंजे’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी संध्याकाळी अंधेरी येथील कोहिनूर हॉटेलमध्ये झाले. त्यावेळी ज्येष्ठ शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, मुंबईचे महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना हा पक्ष नाही, तर ती एक आग आहे. मराठी माणसाच्या मनातील ही आग आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही आग तशीच धगधगत ठेवली. आणि यापुढेही ती धगधगत राहील, असे त्यांनी सांगितले. मराठी माणूस हा मेहनतीने कमावतो आणि मेहनतीच्या पैशांवर जगतो. त्यामुळे तो यापुढेही स्वाभिमानाने जगेल, असे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज