अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्याच्या नावाने व्यापाऱ्याला ९० हजारांचा गंडा

शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले असतानाच चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे प्रकार समोर येत आहेत. फोर्ट येथील एका व्यापाऱ्याला एका इसमाने मुख्यमंत्र्यांकडून नातवाला प्रवेश मिळवून देतो असे सांगून ९० हजारांचा गंडा घातला.

Dipesh More | महाराष्ट्र टाइम्स 28 Jun 2019, 4:47 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fir


शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले असतानाच चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे प्रकार समोर येत आहेत. फोर्ट येथील एका व्यापाऱ्याला एका इसमाने मुख्यमंत्र्यांकडून नातवाला प्रवेश मिळवून देतो असे सांगून ९० हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोर्ट येथील कापडाचे व्यापारी उमेदमल माली यांना नातवासाठी कम्पीयन स्कूल या कुलाबा येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश हवा होता. अनेक प्रयत्न करूनही प्रवेश होत नव्हता. माली यांच्या दुकानात कापड खरेदीसाठी येणाऱ्या सचिन लडगे याला याबाबत समजले. वशिला लावल्याशिवाय प्रवेश होणार नाही. माझी मुख्यमंत्र्यांशी ओळख आहे. त्यांच्या पीएशी बोलून मी काम करून देतो, असे सचिन याने सांगितले. नेहमीचा ग्राहक असल्याने माली यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. सचिन याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे एक अर्ज तयार केला. यासाठी अॅडव्हान्स म्हणून सचिनने ९० हजार रुपये घेतले. 'वर्षा'वर मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो, ते असतील तर तुम्हाला बोलावून घेतो, असे सांगून सचिन निघून गेला. काही वेळाने त्याने फोन करून मुख्यमंत्री उशिरा बंगल्यावर येणार आहेत तुम्ही येऊ नका, असे सांगितले. यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माली यांनी कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार केली.
लेखकाबद्दल
Dipesh More

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज