अ‍ॅपशहर

Aaditya Thackeray: आता आवाजाच्या सहाय्यानं होणार करोना चाचणी; पालिकेचा नवा प्रयोग

आता ध्वनी लहरींवरून करोनाची चाचणी केली जाणार आहे. या नव्या प्रयोगामुळं राज्यातील करोनाचा आकडा अटोक्यात येण्यास मदत मिळणार आहे. असंही बोललं जातं आहे. (Covid voice test trial)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2020, 8:42 pm
मुंबईः देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशभरात महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्टात दररोज करोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणारा असताना आता राज्य सरकारनं करोना चाचणीसाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आवाजाच्या सहाय्यानं करोनाची चाचणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Covid voice test trial


वाचाः चिंता कायम! या जिल्ह्यात करोनामुक्तीचा दर दीड टक्क्यांनी घसरला

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य प्रशासन व राज्य सरकारकडून अनेक खबरदारीचे उपाय राबवण्यात येत असतनाच मुंबई महानगरपालिका AI तंत्रज्ञानानुसार फक्त आवाजाच्या माध्यमातून कोविड टेस्टचं परिक्षण करणार असल्याचं, पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी तसं ट्विटही केलं आहे. राज्यात करोनावर मात करण्यासाठी व्हॉइस सॅम्पल टेस्टिंग हे एक नवं माध्यम ठरेल. अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.


वाचाः शिवरायांसाठी काँग्रेसविरुद्ध शिवसेना आंदोलन करणार का? भाजपचा सवाल

या नव्या प्रयोगात ध्वनी लहरींवरुन कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे निदान केलं जाऊ शकते. ध्वनी लहरींच्या या चाचणीमुळे केवळ ३० मिनिटांत करोनाची लागण झाली आहे की नाही याचे निदान स्पष्ट होणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे

राज्यात शनिवारी करोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. तर शनिवारी १२ हजार ८२२ नवीन रुग्णांचे निदान झाले. शनिवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या २६ लाख ४७ हजार २० नमुन्यांपैकी ५ लाख ३ हजार ८४ नमुने पॉझिटिव्ह (१९ टक्के) आले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज