अ‍ॅपशहर

वेबसाइटनी टाकली कात

आजवर विद्यार्थ्यांना विविध कॉलेजांची माहिती मिळवण्यासाठी संबंधित कॉलेजला प्रत्यक्ष भेट द्यावी लागत होती. कारण कॉलेजचे वेबसाइट असूनही ते अनेकदा अपडेटेड नसायचे. परंतु आता हे चित्र बदलले आहे. सर्व माहिती ऑनलाइन देण्याच्या बाबतीत कॉलेजे सतर्क झाली असून, वेबसाइट वेळोवेळी अपडेट करण्यात येत आहेत.

Maharashtra Times 13 Jun 2016, 4:01 am
विद्यार्थ्यांना कॉलेजांची अद्ययावत माहिती घरबसल्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai colleges websites updation
वेबसाइटनी टाकली कात


कल्पेशराज कुबल, मुंबई

आजवर विद्यार्थ्यांना विविध कॉलेजांची माहिती मिळवण्यासाठी संबंधित कॉलेजला प्रत्यक्ष भेट द्यावी लागत होती. कारण कॉलेजचे वेबसाइट असूनही ते अनेकदा अपडेटेड नसायचे. दोन-तीन वर्षांपूर्वीचीच माहिती किंवा सूचना ‘न्यू बॉक्स’मध्ये ठळक अक्षरात त्यावर झळकत असायची. परंतु आता हे चित्र बदलले आहे. सर्व माहिती ऑनलाइन देण्याच्या बाबतीत कॉलेजे सतर्क झाली असून, वेबसाइट वेळोवेळी अपडेट करण्यात येत आहेत.

मुंबईतील काही मोजक्या कॉलेजांचा अपवाद वगळता पोदार, पाटकर, रुइया, रुपारेल, केसी, सेंट झेवियर्स, सोमैया विद्याविहार, मिठीबाई, खालसा, बिर्ला, डहाणूकर, साठ्ये यांसारख्या सर्व नामांकित कॉलेजांनी आपली वेबसाइटे अद्ययावत ठेवण्यावर भर दिला आहे. काही कॉलेजांनी तर वेबसाइटसाठी विशेष ऑनलाइन टीमच तयार केली आहे. कॉलेजमध्ये चालणारे अभ्यासक्रम, त्यांची प्रवेश प्रक्रिया, पात्रता, प्राध्यापकांची माहिती, कॉलेजचे फोटो, विविध नोटीस बोर्ड, कॉलेजला मिळालेल्या पुरस्कारांची माहिती, विद्यार्थ्यांचे निकाल, विद्यार्थ्यांसह पालकांसाठी असलेल्या सूचना आदी माहिती वेबसाइटवर उपलब्ध असते.

वेबसाइट अपडेट असण्याचा फायदा विद्यार्थ्यांसोबतच कॉलेजांनाही होतो. म्हणजेच पूर्वी चौकशीसाठी कॉलेजबाहेर पालक-विद्यार्थ्यांची गर्दी होत असे. अशावेळी कॉलेज प्रशासनाचीही तारांबळ उडत असे. परंतु आता सर्व माहिती वेबसाइटवर उपलब्ध असल्यामुळे चौकशीसाठी होणारी गर्दी कमी झाली आहे. कॉलेजांच्या या वेबसाइट्सना दिवसाला साधारण दोन हजारांवर विद्यार्थी-पालक भेट देत असतात. हा आकडा प्रवेश प्रक्रियेच्या काळात अजून वाढत असल्याचे कॉलेजांकडून सांगण्यात आले. दरम्यान, अनेक कॉलेजांनी आपली अॅप, सोशल नेटवर्किंग पेजेसही सुरू केली आहेत.

कॉलेज आणि वेबसाइट

पोदार कॉलेज rapodar.ac.in

पाटकर कॉलेज patkarvardecollege.edu.in

रुइया कॉलेज ruiacollege.edu

रुपारेल कॉलेज ruparel.edu

केसी कॉलेज kccollege.org.in

सेंट झेवियर्स कॉलेज xaviers.edu

सोमैया विद्याविहार कॉलेज somaiya.edu

मिठीबाई कॉलेज mithibai.ac.in

बिर्ला कॉलेज birlacollege.org

डहाणूकर कॉलेज mldcc.com

साठ्ये कॉलेज sathayecollege.com

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज