अ‍ॅपशहर

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी

मासिक पाळीचे दिवस महिलांसाठी अतिशय वेदनादायी असतात. या दिवसात त्यांना सुट्टी मिळावी यासाठी सोशल मीडियावर जागृती अभियानही राबवण्यात आले. अखेर याची दखल मुंबईतील एका खासगी कंपनीने घेतली आहे. या कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर केली आहे.

Maharashtra Times 11 Jul 2017, 11:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai company gives women employees a paid day off during their period
मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी


मासिक पाळीचे दिवस महिलांसाठी अतिशय वेदनादायी असतात. या दिवसात त्यांना सुट्टी मिळावी यासाठी सोशल मीडियावर जागृती अभियानही राबवण्यात आले. अखेर याची दखल मुंबईतील एका खासगी कंपनीने घेतली आहे. या कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईतील कल्चर मशिन नावाच्या कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

'कल्चर मशिन' ही एक डिजिटल मीडिया कंपनी आहे. या कंपनीत एकूण ७५ महिला काम करतात. या महिलांसाठी कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी म्हणजे भर पगारी रजा असेल. कंपनीने या महिन्यापासूनच हा निर्णय लागू केला आहे. हा निर्णय लागू करत कंपनीने एक व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. या व्हिडिओत कंपनीतील काही महिलांनी मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी ऑफिसला येण्यावर आपला अनुभव शेअर केला आहे. तसंच सर्व कंपन्यांना हा निर्णय बंधनकारक करावा, अशी मागणी महिलांनी यातून केली आहे.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज