अ‍ॅपशहर

‘त्या’ मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही

लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात रविवारी सुटकेसमध्ये मिळून आलेल्या १२ वर्षांच्या मुलाच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.

Maharashtra Times 12 Jan 2017, 4:01 am
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात रविवारी सुटकेसमध्ये मिळून आलेल्या १२ वर्षांच्या मुलाच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. या गुन्ह्यातील आरोपीचे चित्रण पोलिसांना सीसीटीव्हीत मिळाले आहे. या आरोपीची ओळख पटविण्यासाठी पोलिस आधारकार्डची मदत घेतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai deadbody of 12 year old not identified
‘त्या’ मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही


आधारकार्ड काढताना नागरिकांचे डोळे आणि हाताचे ठसे घेण्यात आले होते. त्यानुसार सीसीटीव्हीतील चित्रण आणि आधारकार्डमधील डेटा पोलिस तपासणार आहेत. आरोपीचे आधारकार्ड असेल, तर पोलिसांना या आरोपीची ओळख मिळू शकेल, असे एका वरिष्ठ अधिका‍ऱ्याने सांगितले. मुलाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सर्व बेपत्ता मुलांची माहिती मागवली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज