अ‍ॅपशहर

मुंबई: सपाच्या माजी नगरसेविकेची आत्महत्या

मुंबई महापालिकेतील समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका नूरजहाँ रफीक शेख (वय ४५) यांनी आत्महत्या केली आहे. गोवंडी, शिवाजी नगर येथील राहत्या घरी रविवारी रात्री गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2018, 3:26 pm
मुंबई: मुंबई महापालिकेतील समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका नूरजहाँ रफीक शेख (वय ४५) यांनी आत्महत्या केली आहे. गोवंडी, शिवाजी नगर येथील राहत्या घरी रविवारी रात्री गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं. कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं समजतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai ex corporator of samajwadi party noorjahan shaikh commits suicide
मुंबई: सपाच्या माजी नगरसेविकेची आत्महत्या


नूरजहाँ यांचा मृतदेह घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी त्यांचा दफनविधी पार पडणार आहे.

नूरजहाँ या शिवाजी नगर येथील प्रभाग क्र. ३७ मधून दोनवेळा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर महापालिकेत निवडून गेल्या होत्या. त्यांनी प्रभाग समितीचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. त्यांच्या कन्या आयेशा शेख या सध्या मुंबई महापालिकेत नगरसेविका असून गोवंडीतूनच निवडून आल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज