अ‍ॅपशहर

सेवाशुल्क आकारल्यास व्हॉट्सअॅप करा!

पुढच्या सात दिवसांत हॉटेलमध्ये खवय्येगिरी केल्यानंतर त्याच्या बिलात सेवाशुल्क आकारल्याचे दिसले तर ते व्हॉट्सअॅपवर कळवावे, असे अवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने केले आहे.

Maharashtra Times 18 Jan 2017, 4:01 am
मुंबई ग्राहक पंचायतचे आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai grahak panchayat whatsapp hotel service charge
सेवाशुल्क आकारल्यास व्हॉट्सअॅप करा!


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये सेवाशुल्क देणे हे ग्राहकांना ऐच्छिक करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने जाहीर केला असला तरी बिलांमध्ये ते समाविष्ट करण्याचीही परवानगी दिल्याने गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे बिलामध्ये सेवाशुल्क समाविष्ट करूच नये, असे निर्देश जारी करावेत, अशी विनंती मुंबई ग्राहक पंचायतने केंद्र सरकारला केली आहे. त्याचबरोबर पुढच्या सात दिवसांत हॉटेलमध्ये खवय्येगिरी केल्यानंतर त्याच्या बिलात सेवाशुल्क आकारल्याचे दिसले तर ते व्हॉट्सअॅपवर कळवावे, असे अवाहनही पंचायतीने केले आहे.

हॉटेलांकडून बिलामध्ये पाच ते वीस टक्के सेवाशुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्याचबरोबर सेवाशुल्काच्या नावाखाली हॉटेलचालक अतिरिक्त पैसे आकारत असले तरी ते खरोखरच वेटर व अन्य कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी वापरले जातात का, अशीही शंका ग्राहक व्यक्त करत आहेत. असे अनेक मुद्दे मांडून केंद्राने निर्णयात अनुषंगिक बदल करावते, अशी विनंती पंचायतीने केंद्रीय ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवान यांना पत्राद्वारे केली आहे. त्याचवेळी पुढच्या सात दिवसांत बिलामध्ये सेवाशुल्क आकारणी झाल्याचे दिसले ९९८७५५५६६५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर बिलाच्या फोटोसह कळवावे, असे आवाहन पंचायतीने नागरिकांना केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज