अ‍ॅपशहर

मोटरमनचे प्रसंगावधान

हार्बर मार्गावर वांद्रे सीएसटी लोकलच्या मोटरमनने रुळावर पडलेला लोखंडी तुकडा पाहून वेळीच ब्रेक दाबल्याने रविवारी मोठा अपघात टळला. किंग्ज सर्कल येथील रेल्वे पुलाला ट्रकचालकाने दिलेल्या धडकेमुळे विजेच्या खांबाचा मोठा तुकडा रुळांवर आदळला.

Maharashtra Times 30 May 2017, 4:01 am
मुंबई ः हार्बर मार्गावर वांद्रे सीएसटी लोकलच्या मोटरमनने रुळावर पडलेला लोखंडी तुकडा पाहून वेळीच ब्रेक दाबल्याने रविवारी मोठा अपघात टळला. किंग्ज सर्कल येथील रेल्वे पुलाला ट्रकचालकाने दिलेल्या धडकेमुळे विजेच्या खांबाचा मोठा तुकडा रुळांवर आदळला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai harbour motorman averts accident
मोटरमनचे प्रसंगावधान


किंग्ज सर्कलवरून जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर रविवारी ट्रकने रेल्वे पुलाच्या एका गर्डरला धडक दिली. या पुलावरून सीएसएटी ते अंधेरी मार्गावरील वाहतूक होते. या पुलावरून पहाटे ४.१६ वाजता जाणाऱ्या लोकलचे मोटरमन अधाके यांनी प्रसंगावधान राखत ब्रेक दाबल्याने अपघात टळला. त्यानंतर या मार्गावरूल वाहतूक ४.३१ वाजेपर्यंत थांबविण्यात आली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज