अ‍ॅपशहर

नासा बॉंम्ब शोधतं, तुम्ही रुळाचे तडे तरी शोधा

नासा अवकाशातून जमिनीत पुरलेले बॉम्ब शोधू शकतं तर अवकाशात चंद्रयान पाठवणारे आपले शास्त्रज्ञ रेल्वे रूळाचे तडे शोधू शकत नाहीत का? असा सवाल उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला केला आहे. रेल्वेरूळांना सातत्याने तडे जात असल्याच्या घटना घडत असल्याने उच्च न्यायालयाने त्यावरून आज रेल्वे प्रशासनाला जोरदार झापले.

Maharashtra Times 17 Mar 2017, 4:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai high courts order to railway related to railway accidents
नासा बॉंम्ब शोधतं, तुम्ही रुळाचे तडे तरी शोधा

नासा अवकाशातून जमिनीत पुरलेले बॉम्ब शोधू शकतं तर अवकाशात चंद्रयान पाठवणारे आपले शास्त्रज्ञ रेल्वे रूळाचे तडे शोधू शकत नाहीत का? असा सवाल उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला केला आहे. रेल्वेरूळांना सातत्याने तडे जात असल्याच्या घटना घडत असल्याने उच्च न्यायालयाने त्यावरून आज रेल्वे प्रशासनाला जोरदार झापले.

एका याचिकेवर बोलताना उच्च न्यायालयाने हा सवाल केला. तसंच रेल्वे रुळांवरील तडे शोधण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घ्या, सर्व रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याबाबत विचार करा, असा सल्लाही हायकोर्टने दिला. याशिवाय मध्य आणि पश्चिम दोन्ही रेल्वे मार्गावरील संरक्षक भिंतींचं काम तातडीन पूर्ण करण्याचे आदेशही हायकोर्टने दिले. रेल्वे रुळाला तडे गेल्याने लोकल वाहतूक विस्कळीत होण्याचं प्रमाण, सध्या नियमित झालं आहे. सातत्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं. त्यामुळेच हायकोर्टाने या सर्व सूचना केल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज