अ‍ॅपशहर

...तर दुसऱ्या ग्रहावर जावे लागेल: हायकोर्ट

पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास दुसऱ्या ग्रहावर जावे लागेल असे सुनावत मेट्रो-३ प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यास मुंबई हायकोर्टाने बंदी कायम ठेवली आहे. मेट्रो-३ च्या प्रकल्पासाठी चर्चगेट परिसरातील झाडे तोडण्यात येणार आहेत. त्याविरोधात स्थानिकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मागील सुनावणीत हायकोर्टाने वृक्षतोड करण्यास मनाई केली होती.

Maharashtra Times 24 Feb 2017, 3:52 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai highcourt banning tree cutting for metro3 project
...तर दुसऱ्या ग्रहावर जावे लागेल: हायकोर्ट

पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास दुसऱ्या ग्रहावर जावे लागेल असे सुनावत मेट्रो-३ प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यास मुंबई हायकोर्टाने बंदी कायम ठेवली आहे. मेट्रो-३ च्या प्रकल्पासाठी चर्चगेट परिसरातील झाडे तोडण्यात येणार आहेत. त्याविरोधात स्थानिकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मागील सुनावणीत हायकोर्टाने वृक्षतोड करण्यास मनाई केली होती.

कुलाबा ते सीप्झ या मार्गावरील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली आहे. चर्चगेट परिसरातील झाडे तोडण्यास मनाई केल्यामुळे या मार्गावरील मार्ग अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. विकास कामे होणे आवश्यक आहे. मात्र, विकास कामे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणे चुकीचे असल्याचे मत हायकोर्टाने व्यक्त केले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास दुसऱ्या ग्रहावर जावे लागेल अशी टिप्पणी हायकोर्टाने केली. याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीत प्रकल्पासाठी तोडण्यात येणारी झाडे ही दुसऱ्या ठिकाणी लावली जातील असे प्रशासनाने म्हटले होते. मात्र, झाडं दुसरीकडे लावल्यावर इथल्या लोकांनी श्वास घ्यायला दुसरीकडे जायचं का? असा सवालही हायकोर्टाने केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज