अ‍ॅपशहर

आयआयटीचे ‘स्वरचक्र’

स्मार्टफोनमध्ये भारतीय भाषांमध्ये टाइपिंग करताना करावी लागणारी कसरत दूर करण्यासाठी आयआयटी मुंबईचे विद्यार्थी पुढे आले आहेत. आयआयटीच्या आयडीसीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वरचक्र’ हे नवे की-पॅड विकासित केले आहे.

Maharashtra Times 18 Mar 2017, 6:17 am
मुंबई : स्मार्टफोनमध्ये भारतीय भाषांमध्ये टाइपिंग करताना करावी लागणारी कसरत दूर करण्यासाठी आयआयटी मुंबईचे विद्यार्थी पुढे आले आहेत. आयआयटीच्या आयडीसीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वरचक्र’ हे नवे की-पॅड विकासित केले असून येत्या २० मार्चला मायक्रोसॉफ्टच्या बंगळुरू येथील कार्यालयात त्याचे उद्घाटन होणार आहे. सध्या ‘स्वरचक्र’ हा एकूण १२ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai iit swarchakra keypad
आयआयटीचे ‘स्वरचक्र’


‘स्वरच्रक’ हा बहुउद्देशीय की-पॅडची रचना अमेरिकेच्या स्वानीसा विद्यापीठाच्या फ्युचर इटरॅक्शन टॅक्नॉलॉजी लॅबच्या मदतीने करण्यात आली आहे. अँड्राइड फोनसाठी या की-बोर्डचा वापर करता येणार आहे. या ‘स्वरचक्र’च्या माध्यमातून एका फोनमध्ये टायपिंग करत असताना दुसऱ्या फोनवरील टायपिंग पाहता येणार आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये हे की पॅड डाऊनलोड करता येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज