अ‍ॅपशहर

लोकल मार्ग हिटलिस्टवर?

दहशतवादी संघटनांकडून मुंबईतील लोकल मार्ग उडवून देण्याचा अॅलर्ट आल्याने पश्चिम रेल्वेचा मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत.

Maharashtra Times 15 Jun 2018, 1:17 am
मुंबई : दहशतवादी संघटनांकडून मुंबईतील लोकल मार्ग उडवून देण्याचा अॅलर्ट आल्याने पश्चिम रेल्वेचा मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाकडून रेल्वे रूळ उडवून देण्याचा कट शिजत असल्याचा संदेश बुधवारी फिरला. वरिष्ठ पातळीवर आलेल्या या ईमेलनंतर तातडीने योग्य उपाययोजना हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai local train route on hitlist
लोकल मार्ग हिटलिस्टवर?


पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात बुधवारी याबाबतचा ईमेल येताच, वरिष्ठ पातळीवर धावपळ सुरू झाली. त्याकडे गांभीर्याने पाहत धोक्याचा संदेश कोणत्या संघटनांकडून आला का, याचाही तपास केला जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज