अ‍ॅपशहर

मुंबईकरांना फटका, मेट्रोच्या भाड्यात वाढ

मुंबई मेट्रो आणि एमएमआरडीएमधील वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही मुंबई मेट्रोने प्रवास भाड्यात वाढ केली आहे. मेट्रोच्या मासिक पास आणि परतीचा भाड्यात वाढ करण्यात आली असून अचानक करण्यात आलेल्या या भाडेवाढीचा प्रवाशांना मोठा फटका बसणार असून या भाडेवाढीवर प्रवाशी संताप व्यक्त करत आहेत.

Maharashtra Times 12 Jun 2017, 8:54 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai metro fare increased after discount less on metro pass
मुंबईकरांना फटका, मेट्रोच्या भाड्यात वाढ

मुंबई मेट्रो आणि एमएमआरडीएमधील वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही मुंबई मेट्रोने प्रवास भाड्यात वाढ केली आहे. मेट्रोच्या मासिक पास आणि परतीचा भाड्यात वाढ करण्यात आली असून अचानक करण्यात आलेल्या या भाडेवाढीचा प्रवाशांना मोठा फटका बसणार असून या भाडेवाढीवर प्रवाशी संताप व्यक्त करत आहेत.

मुंबई मेट्रोने परतीच्या प्रवासाच्या तिकीटात ५ रूपयाने वाढ केली असून मासिक पासाचीही दरवाढ केली आहे. येत्या १४ जून रोजी मुंबई मेट्रो आणि एमएमआरडीएमधील वादावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच भाडेवाढ करण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान करण्यात आल्याचं आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितलं. एमएमआरडीएने न्यायालयीन सुनावणीचा मुद्दा पुढे करून मेट्रोची भाडेवाढ रोखावी, अशी मागणीही त्यांनी केली. न्यायालयाची परवानगी घेऊनच मेट्रोने भाडेवाढ करायला हवी होती, अशी भावना प्रवाशी व्यक्त करत आहेत. तर मेट्रोच्या मासिक भाड्यात वाढ करण्यात आली नसून पासवर मिळणारी सवलत कमी करण्यात आली आहे. इतर शहरातील मेट्रोमध्येही असेच असते, असा खुलासा मेट्रोने केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज