अ‍ॅपशहर

कोहिनूर: नितीन सरदेसाईंची ईडीकडून चौकशी

कोहिनूर स्क्वेअरप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीनंतर ईडीनं मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांची चौकशी सुरू केली आहे. ईडीनं सरदेसाई यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार सरदेसाई हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2022, 10:33 am
मुंबई: कोहिनूर स्क्वेअरप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीनंतर ईडीनं मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांची चौकशी सुरू केली आहे. ईडीनं सरदेसाई यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार सरदेसाई हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitin sardesai
कोहिनूर: नितीन सरदेसाईंची ईडीकडून चौकशी


ईडीनं या आधी कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उर्वेश जोशी यांची चौकशी केली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना समन्स बजावलं होतं. यावरून मनसेचे नेते आक्रमक झाले होते. तसंच महाराष्ट्राचं राजकारण तापलं होतं. २२ ऑगस्टला राज ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास आठ तास राज यांची चौकशी केली होती. आता याच प्रकरणात मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. सरदेसाई आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. त्यामुळं ईडीच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज