अ‍ॅपशहर

मुंबईसह १० महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले!

मुंबईसह १० महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. महानगरपालिकांसह २५ जिल्हा परिषदाचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला. आयोगाने निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे.

Maharashtra Times 11 Jan 2017, 5:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai municipal corporation election 2017
मुंबईसह १० महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले!


मुंबईसह १० महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. महानगरपालिकांसह २५ जिल्हा परिषदाचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला. या घोषणेसह १० महापालिका आणि २५ जिल्हापरिषदांच्या क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यासांठी १६ व २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्यात म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी १५ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १६५ पंचायत समित्या तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी ११ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांमध्ये मतदान होणार आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, सोलापूर, अमरावती, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड या १० महानगरपालिकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर निकाल २३ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहेत.

२१ जानेवारीला अंतिम मतदार यादी

या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल असे सहारिया यांनी सांगितले. १२ ते १७ जानेवारी २०१७पर्यंत यावर हरकती दाखल करता येतील. त्यानंतर २१ जानेवारी २०१७ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका

मुंबई पालिका वगळता अन्य सर्व नऊ महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतील. ठाणे, अमरावती आणि नागपूर पालिकेतील प्रत्येकी एक प्रभाग तीन सदस्यांचा तर उल्हासनगर, नाशिक, पुणे आणि सोलापूर पालिकेचे प्रत्येकी दोन प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. त्यामुळे मतदारांना चार किंवा दोन किंवा तीन मते द्यावी लागतील. जिल्हा परिषदांच्या निवडण्क विभागातील उमेदवारांसाठी व पंचायत समितीच्या निर्वाचक गणातील उमेदवारांसाठी प्रत्येकी एक अशी दोन मते ग्रामीण भागातील मतदारांना द्यावी लागतील.

> जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात, पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारीला मतदान तर दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीला मदतदान होणार

> राज्यातील १० महापालिकेच्या निवडणुकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान

> २३ फेब्रुवारीला महापालिका आणि जिल्हा परिषदांची मतमोजणी होणार

> १४ फेब्रुवारीपासून जनमत चाचणी घेण्यावर बंदी

> मनपासाठी १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता प्रचार बंद होणार

> मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, सोलापूर, अमरावती, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड या १० महानगरपालिकांमध्ये होणार निवडणुका

> १६ फेब्रुवारी रोजी जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ८ पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभागांमध्ये होणार मतदान

> २१ फेब्रुवारी रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यातील ४ पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभागमध्ये होणार मतदान

> जिल्हा परिषद पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत २७ जानेवारी ते एक फेब्रुवारी

> जिल्हा परिषद दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत ०१ ते ६ फेब्रुवारी दरम्यान

> २३ फेब्रुवारी रोजी सर्व २५ जिल्हा परिषद आणि १० महानगरपालिकांचे निकाल जाहीर होणार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज