अ‍ॅपशहर

भुजबळांना दिलासा नाही

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनेक दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारीही मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही.

Maharashtra Times 28 May 2016, 4:01 am
प्रकृती स्थिर असल्याचा मेडिकल बोर्डाचा अहवाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai no relief to bhujbal
भुजबळांना दिलासा नाही


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनेक दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारीही मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही.

भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून औषधे घेतली तर प्रकृती सुधारू शकते, अशा आशयाचा वैद्यकीय अहवाल मेडिकल बोर्डाने शुक्रवारी दिला. त्यानंतर या अहवालाविषयी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करण्यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती भुजबळांच्या वकिलांनी केली. त्यामुळे सुटीकालीन उच्च न्यायालयाने भुजबळांच्या जामीन अर्जावरील सुनावणी नियमित न्यायालयात ८ जून रोजी ठेवली.

प्रकृतीच्या कारणास्तव जामिनासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर भुजबळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचा अहवाल सेंट जॉर्ज रुग्णालयाचा असल्याचे सांगत सरकारने त्याला विरोध केला. तर, हिंदुजा रुग्णालयाचा अहवाल काळजी करण्यासारखा असल्याचा दावा भुजबळ यांचे वकील अमित देसाई यांनी केला. त्यामुळे तीन किंवा त्यापेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या मेडिकल बोर्डाकडून भुजबळ यांची सखोल वैद्यकीय तपासणी करून तपास अधिकाऱ्यामार्फत सीलबंद स्वरुपात अहवाल द्यावा, असे निर्देश न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज