अ‍ॅपशहर

गृहनिर्माण संस्थांसाठी मोठी बातमी, तक्रारींसाठी स्वतंत्र पोलीस अधिकारी असणार: संजय पांडे

गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र पोलीस निरीक्षक असेल, असं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी जाहीर केलं आहे.

Authored byयुवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 May 2022, 5:18 pm

हायलाइट्स:

  • गृहनिर्माण संस्थांसाठी महत्त्वाची बातमी
  • तक्रारींसाठी स्वतंत्र पोलीस अधिकारी
  • संजय पांडे यांची घोषणा
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sanjay Pandey
संजय पांडे
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रविवारी फेसबुक लाइव्ह करत विविध विषयांवर भाष्य केलं. मुंबईतील गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांच्या तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी आणि त्यांच्या अडचणीं समजून घेण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला एक स्वतंत्र इन्स्पेक्टर असेल, अशी घोषणा संजय पांडे यांनी केली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी याशिवाय मुंबईकरांसाठी सिटीझन फोरम स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
मुंबईतील घाटकोपर येथील गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी पोलीस स्टेशनला संस्थेच्या अध्यक्षाविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संजय पांडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. घाटकोपरमधील म्हाडाच्या गृहनिर्माण संस्थेंच्या अध्यक्षानं बैठकीच्या इतिवृत्तात फेरफार केल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षानं इतिवृत्तामध्ये फेरफार करत रहिवाशांबद्दल अपशब्दांचा वापर केल्याची तक्रार करण्यात आली होती. गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षानं आपल्याविरोधात अपशब्दांचा वापर केल्याचं समजल्यानंतर रहिवाशांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घाटकोपर मधील पोलीस ठाण्यात रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आली होती.
अँड्र्यू सायमंड्सची एकमेव इच्छा अखेर अधुरीच राहिली, पत्नी लॉरेनने केला मोठा खुलासा...

सिटीझन फोरमची निर्मिती

मुंबई पोलीसांचे १२ विभाग आहेत. याशिवाय ५ उपविभाग असतील. सिटीझन फोरमची एक वेबसाइट तयार केली आहे. मुंबईकरांनी ती वेबसाइट बनवली आहे. mumbaicf.in अशी वेबसाइट असून त्याला भेट देऊन सूचना कळवाव्यात, असं संजय पांडे म्हणाले. संजय पांडे यांनी सिटीझन फोरमची पहिली बैठक १८ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ या काळात होईल. पहिली बैठक मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात होईल. पुढील बैठका सिटीझन फोरमच्या सदस्यांनी घ्याव्यात, असं संजय पांडे म्हणाले.
औरंगाबादच्या जनतेला विचारा पाणी हवं की संभाजीनगर?, लोक तुमच्या डोक्यात हंडा घालतील, जलील यांची टीका

दरम्यान, मुंबई पोलीस आय़ुक्त संजय पांडे यांनी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असं आवाहन केलं आहे. संजय पांडे यांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा, असं आवाहन केलं आहे.
लेखकाबद्दल
युवराज जाधव
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज