अ‍ॅपशहर

दया नायक पुन्हा मुंबई पोलीस दलात; एन्काऊंटर स्पेशलिस्ट अधिकाऱ्याकडे आता कोणती जबाबदारी?

एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक पुन्हा मुंबई पोलीस दलात पोहोचले आहेत. त्यांची नियुक्ती क्राईम ब्रांचमध्ये करण्यात आली आहे. नायक यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2023, 12:16 pm
मुंबई: एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांना नवी पोस्टिंग मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत त्यांना तैनात करण्यात आलं आहे. नायक यांनी गुन्हे शाखेत पदभार स्वीकारला आहे. नायक यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम daya nayak


पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दया नायक यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट नऊमध्ये पदभार स्वीकारला. दया नायक यांच्यासोबत पाच अन्य अधिकाऱ्यांनादेखील नवीन पोस्टिंग देण्यात आली आहे. मानखुर्द, मरीन ड्राईव्ह, कांदिवली आणि मुंबई वाहतूक पोलिसांमध्ये त्यांना पोस्टिंग दिली गेली आहे.महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत नवी पोस्टिंग मिळाल्याची माहिती दया नायक यांनी ट्विटरवरुन दिली. तुम्हा सर्वांच्या आशा अपेक्षा पूर्ण करेन आणि माझ्या पूर्ण क्षमतेनं मुंबईची सेवा करेन, असं नायक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हृदयद्रावक! निकालाच्या दोन दिवस आधी सारंगचा मृत्यू; दहावीचा टॉपर ६ जणांना जीवदान देऊन गेला
२८ मार्चला महाराष्ट्र एटीएसमधून दया नायक यांची मुंबई पोलिसात बदली झाली. मात्र त्यानंतर दोन महिने त्यांना पोस्टिंग मिळाली नव्हती. २८ मार्चपासूनच ते पोस्टिंगच्या प्रतीक्षेत होते. दया नायक जवळपास तीन वर्षे एटीएसमध्ये कार्यरत होते. तब्बल दोन दशकांनंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत रुजू झाले आहेत. १९९९ ते २००३ या कालावधीत नायक अंधेरी सीआययूमध्ये तैनात होते. त्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत होती. त्यानंतर त्यांना कांदिवली पोलीस ठाण्यात पोस्टिंग मिळाली.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख