अ‍ॅपशहर

पबमध्ये सुरू होती पार्टी, धडक कारवाईनंतर मुंबई पोलिसांचं 'ते' भन्नाट ट्विट व्हायरल

मुंबईतील पबमध्ये पार्टी सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला. कोविड १९ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी सुरेश रैनासह अनेक सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल केला आहे.

Edited byनंदकुमार जोशी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Dec 2020, 3:49 pm
मुंबई: मुंबई पोलिसांनी आज, पहाटे तीन वाजता ड्रॅगनफ्लाय क्लबवर धाड टाकली. कोविड १९ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात क्रिकेटपटू सुरेश रैना आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश असल्याचे कळते. या धडक कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी एक भन्नाट ट्विट केले आहे. हे ट्विट व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पबमध्ये सुरू होती पार्टी, धडक कारवाईनंतर मुंबई पोलिसांचं ते भन्नाट ट्विट व्हायरल


ड्रॅगनफ्लाय क्लबमध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीसीपी जैन आणि पीआय यादव यांच्यासह सहार पोलिसांनी छापा टाकला. या पार्टीत कोविड १९ नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. पार्टीत सहभागी झालेल्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी सुरेश रैनासह इतर ३४ जणांविरोधात गुन्हा नोंदवला. ३४ पैकी १९ जण हे दिल्ली आणि पंजाबमधील, तर उर्वरित दक्षिण मुंबईतील राहणारे आहेत.



रिपोर्ट्सनुसार, काही सेलिब्रिटींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने २२ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीसाठी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर काही तासांतच ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी जबरदस्त ट्विट केले आहे. कारवाईबद्दल माहिती देताना ''Party (Nahin) Chalegi Till Six In The Morning!'' पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग, असे ट्विट पोस्ट करत कारवाईची माहिती दिली आहे. या कारवाईचे नेटकऱ्यांनी स्वागत केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज