अ‍ॅपशहर

पोलिस घोड्यावरून घालणार गस्त

आगामी काही महिन्यात मुंबईच्या रस्त्यांवर अश्वारूढ पोलिस दिसणार आहे. आक्रमक जमाव पांगविणे, गर्दीवर गर्दीमधूनच बारीक लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिस आता घोड्यांवरून गस्त घालताना दिसतील. ३० घोडे खरेदी करण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रस्तावाला गृहविभागाने हिरवा कंदील दिला.

महाराष्ट्र टाइम्स 23 Feb 2019, 4:00 am
जमाव नियंत्रणात आणण्यासाठी कल्पना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai police will get horse mounted unit for crowd control
पोलिस घोड्यावरून घालणार गस्त


तीस घोडे खरेदी करण्याचा प्रस्ताव

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

आगामी काही महिन्यात मुंबईच्या रस्त्यांवर अश्वारूढ पोलिस दिसणार आहे. आक्रमक जमाव पांगविणे, गर्दीवर गर्दीमधूनच बारीक लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिस आता घोड्यांवरून गस्त घालताना दिसतील. ३० घोडे खरेदी करण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रस्तावाला गृहविभागाने हिरवा कंदील दिला असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी सध्या वित्तविभागाकडे असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आपत्कालीन स्थितीमध्ये तसेच एखाद्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या गर्दीवर वरून नजर ठेवणे सोयीचे जाते. भारतामधील चेन्नई, म्हैसूर, कोलकाता पोलिस अशावेळी घोड्यांचा वापर करतात. मॉस्को, न्यूयॉर्कसह अनेक शहरांचे पोलिसही अश्वांचा वापर करतात. त्याच धर्तीवर मुंबई पोलिसांनी देखील ३० घोडे खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात असून पुढच्या तीन महिन्यांत मुंबईत पोलिस अश्वावरून गस्त घालताना दिसणार आहेत. यासाठी सशस्त्र पोलिस विभागातील पोलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुरुवातीला क्लीन येथील कोळे कल्याण येथे या घोड्यांना ठेवण्यात येणार आहे. घोड्यांची देखभाल करण्याचे कंत्राट एखाद्या संस्थेला देण्यात येणार असून अश्व खरेदी आणि इतर सर्व प्रक्रियेसाठी अंदाजे एक कोटी ७५ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

मुंबई पोलिस प्रशासनाचे सहपोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून त्यास मंजुरी मिळाली की, पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. पोलिसांना प्रशिक्षण देण्याबरोबरच अश्वांच्या देखभालीसाठी प्राण्याच्या डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आणखी घोडेखरेदीबाबत विचार केला जाईल, असेही रस्तोगी यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज