अ‍ॅपशहर

रात्रीही होणार पोस्टमॉर्टेम!

रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी जिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे, असे सांगतानाच रात्रीही पोस्टमॉर्टेम करता यावे याबाबत फॉरेन्सिक मेडिसिनच्या तज्ज्ञांशी चर्चा करून १५ दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे.

Maharashtra Times 28 Jul 2016, 4:01 am
आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai postmortem to be conducted in night also
रात्रीही होणार पोस्टमॉर्टेम!


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी जिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे, असे सांगतानाच रात्रीही पोस्टमॉर्टेम करता यावे याबाबत फॉरेन्सिक मेडिसिनच्या तज्ज्ञांशी चर्चा करून १५ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी विधानसभेत दिली. महाराष्ट्र थॅलेसियामुक्त करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

विधानसभेत आरोग्य विभागासंदर्भात २९३ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमॉर्टेमसंबंधीचा कायदा ब्रिटिशकालीन असून, रात्रीसुद्धा पोस्टमॉर्टेम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर डॉ. सावंत यांनी वरील उत्तर दिले. रुग्णांची संख्या वाढत असताना डॉक्टरांची संख्या मात्र कमी होत आहे. डॉक्टर मिळत नसल्याने त्यांची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांची संख्या कमी आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील ४१२ डॉक्टरांची पदे भरण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जालना येथे मनोरुग्णालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. औरंगाबाद येथील कॅन्सर रुग्णालयाला राज्य कॅन्सर रुग्णालयाचा दर्जा देण्यास सरकारची मान्यता आहे. तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याचेही डॉ. सावंत यांनी नमूद केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज