अ‍ॅपशहर

रेल्वेचे जुने पूल होणार भक्कम

एल्फिन्स्टन, अंधेरीतील दुर्घटनांनंतर सावध झालेल्या रेल्वे यंत्रणेने जुने पूल भक्कम करण्याप्रमाणेच नवीन उड्डाणपुलांसाठी तातडीने पावले उचलली आहेत. त्यात मध्य रेल्वेने ठाणे ते नाहूर स्थानकांदरम्यान दोन उड्डाणपुलांची पुनर्बांधणी, अंधेरीत पडलेल्या पादचारी पुलासाठी निविदा मागवताना परळ पुलासाठी सल्लागारही नेमण्यात येणार आहे.

Maharashtra Times 22 Jul 2018, 4:00 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम railway-FOB


एल्फिन्स्टन, अंधेरीतील दुर्घटनांनंतर सावध झालेल्या रेल्वे यंत्रणेने जुने पूल भक्कम करण्याप्रमाणेच नवीन उड्डाणपुलांसाठी तातडीने पावले उचलली आहेत. त्यात मध्य रेल्वेने ठाणे ते नाहूर स्थानकांदरम्यान दोन उड्डाणपुलांची पुनर्बांधणी, अंधेरीत पडलेल्या पादचारी पुलासाठी निविदा मागवताना परळ पुलासाठी सल्लागारही नेमण्यात येणार आहे. दोन पुलांची पुनर्बांधणी, रुंदीकरणासाठी सुमारे १०८ कोटी रुपये, तर अंधेरी, परळ, वसईतील पुलांच्या नव्याने डागडुजीसाठी सुमारे चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम अपेक्षित आहे.

अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पूल कोसळल्यानंतर रेल्वे हद्दीतील सर्व पुलांच्या सुरक्षा आढाव्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वे यंत्रणेने लागलीच दोन उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीसह जुन्या पुलांच्या डागडुजीसाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पूल नव्याने बांधण्यासाठी पश्चिम रेल्वेने निविदा मागवली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज