अ‍ॅपशहर

नववर्ष स्वागतासाठी मुंबई सज्ज

महिन्याभराच्या सरावानंतर सोमवारी अनेक ढोल-ताशा पथकांनी जरा उसंत घेतली. रविवारी या पथकांची रंगीत तालीम झाली आण‌ि मंगळवारी म्हणजे आज गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या शोभायात्रांसाठी जय्यत तयारी झाल्याची त्यांना खात्री पटली. नऊवारी साड्या, नथ, फेटे, पांढरे सदरे असा जबरदस्त ‘वॉर्डरोब’ही शोभायात्रेत सहभागी होणाऱ्यांनी तयार ठेवला आहे.

Maharashtra Times 28 Mar 2017, 3:30 am
फळांच्या राजाच्या आगमनाने आनंद झाला द्विगुणित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai ready for marathi new year
नववर्ष स्वागतासाठी मुंबई सज्ज

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

महिन्याभराच्या सरावानंतर सोमवारी अनेक ढोल-ताशा पथकांनी जरा उसंत घेतली. रविवारी या पथकांची रंगीत तालीम झाली आण‌ि मंगळवारी म्हणजे आज गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या शोभायात्रांसाठी जय्यत तयारी झाल्याची त्यांना खात्री पटली. नऊवारी साड्या, नथ, फेटे, पांढरे सदरे असा जबरदस्त ‘वॉर्डरोब’ही शोभायात्रेत सहभागी होणाऱ्यांनी तयार ठेवला आहे.

गुढीपाडव्याच्या या रंगीत आणि पारंपरिक स्वागतासोबतच नव्या वर्षाची ‘मधुर’ सुरुवात करण्यासाठी फळवाल्यांकडे आंबेही दाखल झाले आहेत. वाशीच्या मुख्य फळबाजारापासून स्थानिक फळबाजारापर्यंत आंब्यांनी आता मार्केट काबीज केले आहे. सोमवारी संध्याकाळी अनेकांनी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आंब्यांची खरेदी केली.

दुसरीकडे गल्लोगल्ली झेंडूच्या फुलांची तोरणे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. सोमवारी दादरमध्ये झेंडूचा दर सुमारे ७० रुपये होता. मंगळवारी ही क‌िंमत आणखी वाढण्याचा अंदाज आहे. कडुलिंबाचा पाला, आंब्याची डहाळ घेऊन अनेक महिला कल्याण, बदलापूर, कर्जतपासून आल्या होत्या. मीनाताई ठाकरे मंडईसमोरही झेंडू घेऊन आलेल्या अनेक ट्रकची गर्दी होती. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या खरेदीसाठी साधारणपणे सोमवारी बंद असणारी दुकानेही सुरू होती. मिठाई, श्रीखंड, बत्तासे यांची जोरदार खरेदी करण्यात आली. पारंपरिक ‘लूक’साठी नथीसोबतच यंदा बुगड्यांचीही तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे. शोभायात्रेच्या स्वागतासाठी सोमवारी रात्रीपर्यंत अनेक ठिकाणी तरुण मंडळी कसून मेहनत घेत होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज