अ‍ॅपशहर

मुंबई: रसविक्रेत्यानं केलं ५ वर्षीय मुलाचं अपहरण

रस विक्री करणाऱ्या तरुणानं प्रेयसीच्या मदतीनं एका पाच वर्षांच्या मुलाचं अपहरण केल्याची घटना मुंबईतील साकीनाका परिसरात घडली. पोलिसांनी अवघ्या चार तासांतच अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळून मुलाची सुटका केली. कर्ज फेडण्यासाठीच मुलाचं अपहरण केल्याची कबुली आरोपीनं दिली.

Narayan Namboodiri | टाइम्स न्यूज नेटवर्क 17 Aug 2018, 2:56 pm
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai sakinaka 5 year old boy kidnapped by debt hit juice vendor rescued
मुंबई: रसविक्रेत्यानं केलं ५ वर्षीय मुलाचं अपहरण

रस विक्री करणाऱ्या तरुणानं प्रेयसीच्या मदतीनं एका पाच वर्षांच्या मुलाचं अपहरण केल्याची घटना मुंबईतील साकीनाका परिसरात घडली. पोलिसांनी अवघ्या चार तासांतच अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळून मुलाची सुटका केली. कर्ज फेडण्यासाठीच मुलाचं अपहरण केल्याची कबुली आरोपीनं दिली.

अक्रम खान (वय २१) असं आरोपीचं नाव आहे. तो साकीनाक्यात शाकिर शेख यांच्या घराबाहेरच रस विक्रीचा व्यवसाय करतो. शाकिर यांच्या मुलाचं अपहरण करण्याचा कट अक्रम आणि त्याच्या प्रेयसीनं रचला. त्यानुसार गुरुवारी त्यांनी संधी साधली. अक्रमची प्रेयसी ही शाकिर यांच्या घराबाहेरच उभी होती. तिनं मुलाचं अपहरण केलं आणि मित्राच्या घरात डांबून ठेवलं. त्यानंतर दोघांनी मुलाच्या वडिलांना फोन करून एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर मुलाला ठार करू, अशी धमकीही दिली. याबाबत शाकिर यांनी गुरुवारी दुपारी दोन वाजता साकीनाका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या चार तासांतच आरोपींना गजाआड केलं.

कुटुंबीयांसोबत अक्रमही मुलाचा शोध घेत होता...

मुलाच्या अपहरणानंतर आई-वडील, शेजारी त्याचा परिसरात शोध घेत होते. त्यांच्यासोबत अक्रमही होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपहृत मुलाच्या वडिलांनी पैसे दिल्यानंतर त्यातून कर्ज फेडणार होतो, अशी कबुली अक्रमनं चौकशीदरम्यान दिल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज