मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी केलेला अटकपूर्व जामीन आज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांनी हा निर्णय दिला. काल नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पू्र्ण झाली होती. ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी सोमय्यांसाठी युक्तीवाद केला होता. (mumbai sessions court rejects pre arrest bail application of neil somaiya) शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध आहेत असा त्यांचा आरोप होता. यावेळी 'बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे' असे वक्तव्य राऊत यांनी केले होते.
क्लिक करा आणि वाचा- काल राज्यात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट; पाहा ताजी स्थिती!
यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला. काल नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावार सुनावणी पूर्ण झाली. आज न्यायालयानेत्यांचा अर्ज फेटाळ्यानंतर नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
क्लिक करा आणि वाचा- Breaking सरकारच्या आश्वासनानंतर खासदार संभाजीराजेंचे आमरण उपोषण मागे
नील सोमय्या यांचे राकेश वाधवान यांच्याशी संबंध आहेत आणि त्याबाबतची कागदपत्रे आपण लवकरच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहोत, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यानंतर आपल्याला अटक होऊ शकते असा अंदाज आल्यानंतर नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी अगोदरच न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘निकॉन इन्फ्रा’ च्या माध्यमातून अनेक ठिकाणी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्या गेल्या असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत केला होता.
क्लिक करा आणि वाचा- संजय पांडे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त, हेमंत नगराळेंना सुरक्षा महामंडळाची जबाबदारी