अ‍ॅपशहर

शीव उड्डाणपूल आजपासून बंद

पहिल्या दोन टप्प्यात शीव उड्डाणपुलाचे ६४ बेअरिंग यशस्वीरित्या बसवण्यात आले आहेत. आज, शुक्रवारी, सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेल्या तिसऱ्या ब्लॉकमध्ये एकूण १६ बेअरिंग बदलण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 6 Mar 2020, 6:02 am
मुंबई : पहिल्या दोन टप्प्यात शीव उड्डाणपुलाचे ६४ बेअरिंग यशस्वीरित्या बसवण्यात आले आहेत. आज, शुक्रवारी, सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेल्या तिसऱ्या ब्लॉकमध्ये एकूण १६ बेअरिंग बदलण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sion flyover bridge


या कामासाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णत: बंद राहील. आयआयटी मुंबईच्या अहवालानुसार उड्डाणपुलाच्या बळकटीकरणासाठी १६० बेअरिंग बदलणे गरजेचे होते. त्यानुसार मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे. हा ब्लॉक ९ मार्चला सकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज