अ‍ॅपशहर

​ विद्यार्थ्यांना अखेर निर्वाह भत्ता!

मुंबईसह राज्यातील सरकारी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निर्वाह भत्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक दिवसांपासून हा निधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती.

Maharashtra Times 24 Apr 2017, 4:01 am
मुंबई : मुंबईसह राज्यातील सरकारी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निर्वाह भत्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक दिवसांपासून हा निधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र समाजकल्याण विभागामार्फत दरमहा ८०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai students to get allowance
​ विद्यार्थ्यांना अखेर निर्वाह भत्ता!


राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना विद्यालयीन खर्चासाठी दरमहा ८०० रुपयांचा निर्वाह भत्ता देण्यात येतो. मात्र समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे वर्षभरापासून राज्यातील अनेक वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना तो देण्यात येत नव्हता. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी प्रहार विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले होते. तसेच समाज कल्याण सहआयुक्तांना निवेदन देऊन ‘भीक मांगो’ आंदोलनाचा इशारा दिला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज