अ‍ॅपशहर

दिल्ली-मुंबई...११ तास ४९ मिनिटे

देशातील वेगवान प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्पेनच्या टॅल्गो या हायस्पीड ट्रेनच्या सुरू असणाऱ्या चाचणीसत्रातील सहावी व अंतिम चाचणी रविवारी यशस्वी ठरली.

Maharashtra Times 11 Sep 2016, 10:59 pm
हायस्पीड ‘टॅल्गो’ ट्रेनची अंतिम चाचणीही यशस्वी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai talgo train test successful
दिल्ली-मुंबई...११ तास ४९ मिनिटे


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

देशातील वेगवान प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्पेनच्या टॅल्गो या हायस्पीड ट्रेनच्या सुरू असणाऱ्या चाचणीसत्रातील सहावी व अंतिम चाचणी रविवारी यशस्वी ठरली. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते दिल्ली मार्गावर १५० किमी प्रतितासाने चालवण्यात आलेल्या या टॅल्गो ट्रेनने दिल्ली ते मुंबई सेंट्रलचे अंतर विक्रमी ११ तास ४९ मिनिटांमध्ये पार केले.

भारतीय रेल्वेतील सर्वात वेगवान ट्रेन मानली जाणारी राजधानी एक्स्प्रेस नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रलपर्यंतचे अंतर १६ तासांमध्ये पूर्ण करते. या दोन स्टेशनांमधील प्रवासाचा वेळ कमी व्हावा यासाठी टॅल्गो ट्रेनच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रतितास १५० किमी वेगाने गाडी चालवून हे अंतर १२ तासांत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट अखेर रविवारी साध्य झाले. गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली ते मुंबई मार्गावर टॅल्गोच्या चाचण्या सुरू आहेत. त्यातील अंतिम चाचणी अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाली. सहाव्या आणि अंतिम चाचणीत ही ट्रेन १२ तासांच्या आत मुंबईत पोहोचली. रविवारी मध्यरात्री मुंबईत दाखल झालेली ही ट्रेन पहाटे पाच वाजता पुन्हा दिल्लीकडे रवाना झाली. ‘टॅल्गो’ची पहिली चाचणी २ ऑगस्ट रोजी ताशी १३० किमी वेगाने झाली. त्यावेळी ही गाडी दीड तास उशिराने मुंबई सेंट्रलला पोहोचली होती. ६ ऑगस्टच्या दुसऱ्या चाचणीवेळी ही ट्रेन मुंबईत वेळेत दाखल झाली. मात्र चौथ्या चाचणीत या गाडी १७ मिनिटे उशिराने पोहोचली होती. अन्य मार्गांवरही चाचण्या

रेल्वे मंत्रालयाने देशात अन्य ठिकाणीही टॅल्गोच्या चाचण्या घेण्याचा गांभीर्याने विचार चालवला आहे. त्यात, मुंबई-गोवा, दिल्ली​-चंडीगढ, दिल्ली-आग्रा, दिल्ली-कानपूर, मुंबई-अहमदाबाद, नागपूर-विलासपूर, म्हैसूर-बेंगळुरू-चेन्नई, मुंबई-अहमदाबाद, चेन्नई-हैद्राबाद, नागपूर-सिकंदराबाद या मार्गांचा समावेश आहे.

दिल्लीहून शनिवारी दुपारी २.४५ वाजता रवाना

रविवारी पहाटे २.३३ वाजता गाठ ले मुंबई सेंट्रल

पल्ला सुमारे हजार किमीचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज