अ‍ॅपशहर

सहामाहीचे ‘मूल्यमापन’ करायचे कसे?

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (विद्या परिषद) मूल्यमापन चाचणी परीक्षा येत्या १९ आणि २० ऑक्टोबर रोजी घेण्याच्या सूचना शाळांना केल्या आहेत. याच काळात मुंबईसह राज्यातील अनेक शाळांमध्ये सहामाही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Maharashtra Times 6 Oct 2016, 4:47 am
शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्ये चिंतेचे वातावरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai teachers under confusion on semester exam valuation
सहामाहीचे ‘मूल्यमापन’ करायचे कसे?


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (विद्या परिषद) मूल्यमापन चाचणी परीक्षा येत्या १९ आणि २० ऑक्टोबर रोजी घेण्याच्या सूचना शाळांना केल्या आहेत. याच काळात मुंबईसह राज्यातील अनेक शाळांमध्ये सहामाही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षांचे ‘मूल्यमापन’ करायचे कसे, असा प्रश्न शिक्षक-मुख्याध्यापकांना सतावत आहे. अनेकांनी याप्रश्नी शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतल्याची माहितीही हाती आली आहे.

विद्या परिषदेतर्फे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात येणारी शालेय विद्यार्थ्यांची प्रथम भाषा आणि गणित विषयाची संकलित मूल्यमापन चाचणी १९ आणि २० ऑक्टोबरला होणार आहे. गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या या चाचण्यांच्या आयोजनात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गोंधळ केला असल्याचे शाळांचे म्हणणे आहे. मूल्यमापन चाचणीमुळे आता शाळांना सहामाही परीक्षेचे नियोजन बदलावे लागणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा आणि गणित या विषयांची संकलित मूल्यमापन चाचणी १९ आणि २० तारखेला होईल. इतर विषयांच्या परीक्षांचे नियोजन मात्र सुटीचे आणि हे दोन दिवस वगळून करावे लागणार आहे. यामुळे सहामाही परीक्षांसाठी इतर विषय आणि संकलित मूल्यमापन चाचणीच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना खूप कमी वेळ मिळणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज