अ‍ॅपशहर

पावसाळ्यात संसर्ग: मुंबईकर घसादुखीने बेहाल

पावसाळा सुरू झाल्यानंतर संसर्गजन्य तापाने डोके वर काढायला सुरुवात केलेली असतानाच आता घसादुखीमुळेही मुंबईकर बेजार झाले आहेत. सर्दी, खोकल्यामुळे घशाचे दुखणे वाढत असल्याची तक्रार अनेकजण करत आहेत.

Maharashtra Times 28 Jun 2018, 4:45 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम throat-infection


पावसाळा सुरू झाल्यानंतर संसर्गजन्य तापाने डोके वर काढायला सुरुवात केलेली असतानाच आता घसादुखीमुळेही मुंबईकर बेजार झाले आहेत. सर्दी, खोकल्यामुळे घशाचे दुखणे वाढत असल्याची तक्रार अनेकजण करत आहेत.

मुळात घसादुखीसाठी सर्दीच होणे गरजेचे नाही. वातावरणातील बदलांमुळेही हा त्रास होऊ शकतो, असे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. महेश भोईर यांनी सांगितले. घशात जंतूसंसर्ग झाल्यास डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये पाळणे गरजेचे असते. तापासाठी औषधोपचार घेतले जातात; तसे घसादुखीसाठी घेतले जात नाही. केवळ घरगुती उपचारांवर भर दिला जातो. त्यामुळे संसर्ग बळावतो. याकडे डॉ. गिरिजा सामंत यांनी लक्ष वेधले. ताप आल्यानंतर श्वसनमार्गाला संसर्ग करणारे घटक वेगाने सक्रिय होतात. त्यामुळे स्वरयंत्रणेलाह सूज येते. त्यामुळे आवाज बसण्याच्या तक्रारी वाढताना.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज