म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर शुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ९१ वर्षीय यशवंत देव यांना १० ऑक्टोबरपासून या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
खूपच अशक्तपणा आल्याने देव यांना शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीमध्ये त्यांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यादृष्टीने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, प्रकृतीत सुधारणा आढळून आली नसून, ती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. सध्या त्यांच्यावर न्यूमोनिया या श्वसनविकारावरही उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान काहीवेळा हाक मारल्यावर देव यांनी डोळे उघडून प्रतिसाद दिला. मात्र, आजारपणाचा अवयवांवर परिणाम झाल्याचीही माहिती आहे.