अ‍ॅपशहर

मुस्लिम तरुणाच्या महाप्रसादानं गणेशोत्सवात गोडवा

समाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना साकीनाक्यातील फिरोज युसूफ अन्सारी या मुस्लिम तरुणानं सामाजिक सौहार्द व समन्वयाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. धर्माच्या भिंती ओलांडून गेल्या दहा दिवसांपासून हा तरुण गणरायाच्या सेवेत गुंतला आहे. इतकंच नव्हे, गेल्या २३ वर्षांपासून गणेश मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या फिरोजनं यंदा मंडळाच्या महाप्रसादाचा संपूर्ण आर्थिक भार स्वत: पेलला आहे.

Maharashtra Times 14 Sep 2016, 4:20 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम muslim youngster serving ganpati mandal since 23 years
मुस्लिम तरुणाच्या महाप्रसादानं गणेशोत्सवात गोडवा

समाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना साकीनाक्यातील फिरोज युसूफ अन्सारी या मुस्लिम तरुणानं सामाजिक सौहार्द व समन्वयाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. धर्माच्या भिंती ओलांडून गेल्या दहा दिवसांपासून हा तरुण गणरायाच्या सेवेत गुंतला आहे. इतकंच नव्हे, गेल्या २३ वर्षांपासून गणेश मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या फिरोजनं यंदा मंडळाच्या महाप्रसादाचा संपूर्ण आर्थिक भार स्वत: पेलला आहे.

साकीनाक्यातील गजानन इस्टेट व गणेश चाळ परिसरातील साईकृपा मित्र मंडळ प्रतिवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करते. या गणेशोत्सवात फिरोज अन्सारी याचा सक्रिय सहभाग असतो. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सर्व कामांत त्याचा पुढाकार असतो. साईकृपा मंडळाच्या गणपतीचे स्वागत फिरोजच्या रांगोळीनेच होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी रांगोळी घालून तो गणरायाचे स्वागत करतो. त्यानंतरचे दहा दिवस 'गणपती बाप्पा मोरया' लिहिलेला भगवा शेला घालून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सरबराई करण्यात गुंतलेला असतो.

केवळ तन, मनच नव्हे तर यथाशक्ती धन खर्च करून फिरोज गणरायची सेवा करतो. उत्सवाच्या निमित्तानं साईकृपा मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. या महाप्रसादाचं आर्थिक नियोजन करणं मोठं जिकिरीचं असतं. पण यंदा फिरोजनं महाप्रसादाचा संपूर्ण खर्च उचलून मंडळाला मोठा दिलासा दिला आहे. फिरोजचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन व समन्वयी स्वभाव संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

मी आधी भारतीय!

खासगी क्लास चालवणाऱ्या फिरोजला मात्र यात काही विशेष वाटत नाही. स्वत: मुस्लिम असताना हिंदूंच्या सणात इतका सक्रिय असल्याबद्दल त्याच्या समाजातील अनेक लोक त्याला विचारतात. याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणतो, 'अनेक लोक मला विचारतात, पण त्यामुळं मला काही फरक पडत नाही. मी आधी भारतीय आहे. मग मुस्लिम आहे. मुळात मला सार्वजनिक कामं आणि लोकांची मदत करायला आवडतं. गणपती, दिवाळी, ईद आणि ख्रिसमस या सर्वांमध्ये माझा सहभाग असतो. ख्रिसमसच्या दिवसांत चर्चमध्ये होणाऱ्या कॅरल सिंगिंगमध्येही माझा सहभाग असतो,' असं त्यानं सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज