अ‍ॅपशहर

अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे

मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा मुद्दा यंदा संमेलनात गाजणार अशी अपेक्षा संमेलनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली. ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, हा नारा घुमला...

Maharashtra Times 17 Feb 2018, 4:01 am
संमेलनात घुमला नारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम samelan


सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे

मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा मुद्दा यंदा संमेलनात गाजणार अशी अपेक्षा संमेलनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली. ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, हा नारा घुमला.

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते हे ध्वजारोहण झाले. महाराष्ट्रातून येऊन मराठी बांधवांनी अटकेपार झेंडा इथे रोवला आहे. हा साहित्याचा झेंडा फडकवताना मला स्वराज्याचा झेंडा अटकेपार फडकवल्याची आठवण येते, असे सांगत परराज्यात मराठी रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि मराठी टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मराठी बांधवांचे श्रीनिवास पाटील यांनी कौतुक केले. ही मूल्यांची आणि साहित्याची साखळी आहे, असेही ते म्हणाले. यानिमित्ताने मराठी मनात असणारी इतर खदखदही पूर्ण होवो अशी सदीच्छा त्यांनी कोणत्याही प्रांताचा उल्लेख न करता व्यक्त केली.

मराठी साहित्य महामंडळाचा झेंडा हा मराठी व्यापक अस्तित्वाशी, स्वाभिमानाशी आणि अस्मितेशी जोडलेला आहे. तो स्वाभिमान आणि अस्मिता टिकून राहण्यासाठी आणि त्या अस्मितेने केलेल्या मागण्या आहेत, त्यांची परिपूर्ती केंद्र आणि राज्य सरकारने करावी, अशी प्रातिनिधिक मागणी ध्वजारोहणाच्या निमित्ताने महामंडळ अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज