अ‍ॅपशहर

शिव वडापावला टक्कर ‘नमो टी स्टॉल’ची

शिवसेनेच्या ‘शिव वडापाव’ला टक्कर देण्यासाठी भाजप ‘नमो टी स्टॉल’ आता लवकरच रस्त्यावर दिसणार आहेत. मुंबईत असे स्टॉल उभारण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Maharashtra Times 28 May 2016, 1:44 pm
मुंबईः शिवसेनेच्या ‘शिववडापाव’ला टक्कर देण्यासाठी भाजप ‘नमो टी स्टॉल’ आता लवकरच रस्त्यावर दिसणार आहेत. मुंबईत असे स्टॉल उभारण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम namo food stall
शिव वडापावला टक्कर ‘नमो टी स्टॉल’ची


दुष्काळामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी शहरात विविध ठिकाणी ‘नमो फूड आणि टी स्टॉल’सुरू करण्याचा प्रस्ताव सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. हे स्टॉल सुरू करण्यासाठी बेरोजगारांना पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे स्टॉल लावतानाच शहराच्या स्वच्छतेविषयी, कचराकुंडी आण‌ि खराब पाण्याचा निचरा करण्याबाबत विचारही करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेला परवाना शुल्क आणि मासिक भाड्यातून उत्पन्नही मिळेल, असा दावाही त्यांनी केला. : शिवसेनेच्या ‘शिव वडापाव’ला टक्कर देण्यासाठी भाजप ‘नमो टी स्टॉल’ आता लवकरच रस्त्यावर दिसणार आहेत. मुंबईत असे स्टॉल उभारण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दुष्काळामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी शहरात विविध ठिकाणी ‘नमो फूड आणि टी स्टॉल’सुरू करण्याचा प्रस्ताव सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. हे स्टॉल सुरू करण्यासाठी बेरोजगारांना पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज