अ‍ॅपशहर

बंगले वाटप झाले; खातेवाटप कधी? राणेंचा खोचक सवाल

नव्या सरकारमधील मंत्र्यांना बंगले वाटून झाले, पण अद्याप खातेवाटप झालेले नाही. मंत्रालयातली दालने घेतली, पण कारभार सुरू झालेला नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न नाहीत. उलट खातेवाटपाआधीच राजीनामा द्यायला सुरूवात झाली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jan 2020, 8:36 pm

बीडमध्ये भाजपनं मैदान सोडलं; पंकजांकडून पराभव मान्य

माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या: अब्दुल सत्तार

मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम narayan-rane

नव्या सरकारमधील मंत्र्यांना बंगले वाटून झाले, पण अद्याप खातेवाटप झालेले नाही. मंत्रालयातली दालने घेतली, पण कारभार सुरू झालेला नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न नाहीत. उलट खातेवाटपाआधीच राजीनामा द्यायला सुरूवात झाली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

ते म्हणाले, 'हे अल्पावधीचं सरकार आहे. ते दोन महिनेदेखील टिकणार की नाही याबाबत शंका आहे. जे सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत, त्यांना प्रशासनाचा एक टक्कादेखील अनुभव नाही. त्यांना कारभार हाकता येत नाही. त्यांचा कुणावर वचक नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देणार म्हणाले. तसा जीआर काढला तर त्यात केव्हापासून पैसे देणार याबाबत कुठंच काही लिहिलेलं नाही. ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे.' एका वृत्तवाहिनीशी बोलताना राणे यांनी हे वक्तव्य केले.

हे तीन पक्ष एकत्र आलेत, त्यांची ध्येयधोरणं वेगवेगळी आहेत. ते जनतेसाठी नव्हेत, सत्तेसाठी एकत्र आले आहेत. ही शिवसेनेची सत्ता नाही, तर राष्ट्रवादीची आहे. काँग्रेस आणि शिवसेना केवळ नावापुरते आहेत. त्यांचं मंत्रिमंडळात अस्तित्वदेखील नाही, असं राणे म्हणाले.

अब्दुल सत्तार गद्दार, शिवसेनेतून हाकला: खैरे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज