अ‍ॅपशहर

अजित पवारांचं 'बंड'; राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं?

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं बंड हे राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची जोरदार चर्चा आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी दोन दिवसानंतर एक एक ट्विट करून तसे संकेतही दिले होते. तर अजितदादांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही हे सर्व घडवून आणलेलं होतं. शरद पवार यांना समजून घेण्यासाठी त्यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळेही अजितदादांचं बंड हे आधीच ठरलं होतं, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2019, 9:26 am

...म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला: अमित शहा

मुंबई: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं बंड हे राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची जोरदार चर्चा आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी दोन दिवसानंतर एक एक ट्विट करून तसे संकेतही दिले होते. तर अजितदादांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही हे सर्व घडवून आणलेलं होतं. शरद पवार यांना समजून घेण्यासाठी त्यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळेही अजितदादांचं बंड हे आधीच ठरलं होतं, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pawar-family


शनिवार दिनाकं २३ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीत प्रचंड खळबळ उडाली होती. अजित पवार यांनी बंड ही भाजपची खेळी असून आघाडीसाठी हा मोठा दणका असल्याचंही बोललं जात होतं. विशेष म्हणजे शपथविधीनंतर अजित पवार यांनी कुणाशीही संवाद साधला नव्हता. त्यामुळे अधिकच सस्पेन्स वाढला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या आमदारांनाही सुरक्षितस्थळी हलवले होते. त्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी २५ नोव्हेंबर रोजी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केल्याने अजित पवार यांचं हे बंड राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच घडवून आणल्याची चर्चा रंगली होती. 'हे कृत्रिम हास्य फार काळ टिकणार नाही. भावांनो, अजून पवार साहेबांनी शेवटचे पत्ते फेकले नाहीत. थोडा धीर धरा. फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेतेपदाची शपथ घेतील, यावर विश्वास ठेवा. दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते. त्यांना पाठविलं होतं. आपल्याला इतका इतिहास जरी समजून घेता!,' असं मिटकरी यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच अजित पवार यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. रात्री उशिरा सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांची दोन तास चर्चा केली. त्यानंतर आज विधानसभेत येऊन त्यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आणि दुपारी हॉटेल ट्रायडंट येथील महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीला हजेरीही लावली. जणू काही झालेच नाही, अशा अविर्भावात अजितदादा वावरत होते. दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना मी राष्ट्रवादीत आहे, हे मी आधीच जाहीर केलं होतं, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा शपथविधी; कोर्टाला सुरक्षेची चिंता


तर काल जय अजित पवार यांनी त्यांच्या फेसबुकवर 'दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होतं...' असं ट्विट केलं होतं. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या नाट्याचे लेखक, दिग्दर्शक कोण होतं, हे तुम्हाला यथावकाश समजेल. पवारांना समजून घेण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील हे मी आधीच सांगितलं होतं, असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अजितदादांच हे राजीनामा नाट्य हा पवारांच्या खेळीचाच एक भाग होता, असं बोललं जात आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या बदलीची शक्यता



महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज