अ‍ॅपशहर

​ पत्रकार हल्ल्याची चौकशी व्हावी

नवी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण गंभीर असून, त्या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे सदस्य अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी केली.

Maharashtra Times 1 Apr 2017, 4:01 am
मुंबई: नवी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण गंभीर असून, त्या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे सदस्य अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम navi mumbai journalist sudhir suryavanshi attack emand o investigation
​ पत्रकार हल्ल्याची चौकशी व्हावी


पत्रकार हा समाजाचा प्रतिनिधी असतो. त्याच्यावर कसल्याही प्रकारचे बंधने असता कामा नये. पत्रकारांवरील हल्ला होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे पत्रकार हल्लाविरोधी कायदा तातडीने व्हावा यासाठी राज्यातील विविध पत्रकार संघटनांची मागणी असून, ती मागणी आम्हीसुद्धा सरकारकडे लावून धरणार असल्याचे गाडगीळ यांनी आवर्जून सांगितले. सूर्यवंशी यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह असून त्याची सखोल चौकशीची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज