अ‍ॅपशहर

शरद पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून

नेते, खासदार व आमदार सोडून चालल्यामुळं राजकीय अस्तित्व संकटात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरणार आहेत. पवार हे येत्या मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असून सोलापुरातून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2019, 12:09 pm
मुंबई: नेते, खासदार व आमदार सोडून चालल्यामुळं राजकीय अस्तित्व संकटात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरणार आहेत. पवार हे येत्या मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असून सोलापुरातून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ncp chief sharad pawars maharashtra tour will start from tuesday
शरद पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून


राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारपासून शरद पवार दौऱ्यावर निघणार आहेत. सोलापुरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची पहिली बैठक होणार आहे. पवारांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलेला माढा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात येतो. मागील निवडणुकीत पक्षांतर्गत राजकारणामुळं या मतदारसंघातून पवारांना माघार घ्यावी लागली होती. आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पवार याच जिल्ह्यातून करणार आहेत.

पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर व सातारा जिल्ह्यात बैठका घेऊन ते पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भाजप-शिवसेनेकडे जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांना थोपवणे व पक्षात अजूनही असलेल्यांना विश्वास देणे हाच या दौऱ्याचा मुख्य हेतू असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज