अ‍ॅपशहर

गोव्यात भाजपला पाठिंबा नाही: राष्ट्रवादी

गोव्यात मनोहर पर्रिकर सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल अलेमाओ यांनी भाजपला दिलेला पाठिंबा हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असून त्यांच्या निर्णयाशी राष्ट्रवादीचे काहीही घेणेदेणे नाही, असा खुलासा करत राष्ट्रवादीने अलेमाओ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Maharashtra Times 17 Mar 2017, 1:12 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ncp has not supported bjp led govt in goa
गोव्यात भाजपला पाठिंबा नाही: राष्ट्रवादी

गोव्यात मनोहर पर्रिकर सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल अलेमाओ यांनी भाजपला दिलेला पाठिंबा हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असून त्यांच्या निर्णयाशी राष्ट्रवादीचे काहीही घेणेदेणे नाही, असा खुलासा करत राष्ट्रवादीने अलेमाओ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हा खुलासा केला आहे. राष्ट्रवादीने गोव्यात भाजपला कोणताही पाठिंबा दिलेला नाही. भाजपला पाठिंबा देण्याचा चर्चिल अलेमाओंचा व्यक्तिगत पाठिंबा असून त्याला पक्षाने मान्यता दिलेली नाही, असे नवाब मलिक यांनी टि्वटद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच अलेमाओ यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचेही मलिक यांनी सांगितलं.
NCP has not supported #BJP led Govt in #Goa. Support given by Churchill Alemao is his personal decision & is not approved by the party (1/2) — nawab malik (@nawabmalikncp) March 17, 2017 पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना न सांगता भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात असून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे तुमच्याविरोधात कारवाई का करू नये? असा सवाल या नोटीशीत अलेमाओ यांना करण्यात आला आहे.
A show cause notice has been given to Churchill Alemao for his anti party action & a reply is awaited. (2/2) @PTI_News @ANI_news @NCPspeaks — nawab malik (@nawabmalikncp) March 17, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज