अ‍ॅपशहर

मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; निलेश राणेंचं ट्विट चर्चेत

कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले होते. (Dhananjay munde)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2021, 10:28 am
मुंबईः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांनतर राज्यातील राजकारण तापले आहे. मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनीही धनंजय मुंडेंबाबत भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nilesh-rane


धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळं भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडेंवरील आरोपांवर देवेंद्र फडणवीसांची संयमी भूमिका; म्हणाले...

'कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे, माहिती लपवणं निवडणूक आयोगानुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंयज मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे,' अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.


दरम्यान, धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून खुलासा केला आहे. त्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलन करु, असा इशाराच दिला आहे. त्यामुळं यासगळ्या प्रकरणावर अधिक राजकारण तापण्याची शक्यता आहे.

देशातील 'या' बड्या नेत्यांनी लग्नानंतर थाटला दुसरा संसार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज