अ‍ॅपशहर

श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरेंचा शिवसेना प्रवेश लांबणीवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांचा शिवसेना प्रवेश तूर्त लांबणीवर पडला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळं राष्ट्रवादीसह तटकरे कुटुंबीयांमध्ये चलबिचल झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Aug 2019, 3:06 pm
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांचा शिवसेना प्रवेश तूर्त लांबणीवर पडला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळं राष्ट्रवादीसह तटकरे कुटुंबीयांमध्ये चलबिचल झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ncp mla from shrivardhan met shiv sena chief uddhav thackeray in mumbai
श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरेंचा शिवसेना प्रवेश लांबणीवर


अवधूत तटकरे यांनी आज दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेतली. ते आजच शिवबंधन बांधून घेतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांचा शिवसेना प्रवेश झाला नाही. तटकरे व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये यावेळी रायगडमधील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली.

अवधूत यांनी स्वत: या चर्चेची माहिती पत्रकारांना दिली. 'उद्धव ठाकरेंशी झालेल्या भेटीत राजकीय चर्चा झाली. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याबाबत ही चर्चा होती. पक्ष प्रवेशाबद्दल आज काहीही झालं नाही. माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेईन,' असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातमी:

राष्ट्रवादीचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज