अ‍ॅपशहर

पराभवानंतर दिला अमिताभचा दाखला!

'अमिताभ बच्चन यांचे चित्रपटही पडतात', असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीला पालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या अपयशातून आम्ही निश्चितच बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Maharashtra Times 24 Feb 2017, 12:44 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ncp mp supriya sule give amitabh bachchan example after civic poll defeat
पराभवानंतर दिला अमिताभचा दाखला!


'अमिताभ बच्चन यांचे चित्रपटही पडतात', असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीला पालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या अपयशातून आम्ही निश्चितच बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

माध्यमांनी राष्ट्रवादीच्या अपयशाबद्दल विचारलं असता त्यांनी त्यांनी थेट अमिताभ यांचा दाखला दिला. अमिताभ यांचेही चित्रपट पडतात म्हणून त्यांचं मोठेपण कमी होत नाही. ते महान कलाकार आहेत आणि राहणार ही बाब येथे लक्षात घ्यायला हवी, असे नमूद करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून सत्तेत आहे. त्यामुळे एखाद्या निवडणुकीतील अपयशाने खचून जाणाऱ्यांपैकी आम्ही नाहीत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामे करूनही मतदारांचा कौल आम्हाला मिळाला नाही. आमचं तिथे नेमकं काय चुकलं हे आम्हाला पाहावं लागेल. तेथील कौल आम्हाला मान्य आहे. आम्ही या निकालावर आत्मचिंतन करू आणि संघटनेची बांधणी नव्याने करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पालिका व जिल्हा परिषदांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी भाजपचंही अभिनंदन केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज