अ‍ॅपशहर

भाजपला मतदान; राष्ट्रवादीचे 'ते' नगरसेवक गोत्यात

अहमदनगर महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Dec 2018, 5:08 pm
मुंबई :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jayant-patil


अहमदनगर महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगरमध्ये भाजपचा महापौर आणि उपमहापौर विराजमान झाला आहे. नगरमधल्या या नव्या समीकरणाचे राज्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, नगरमध्ये जे घडलं तो सर्वस्वी स्थानिक पातळीवरील नेत्यांचा निर्णय असल्याचे म्हणत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

नगर पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो अत्यंत आक्षेपार्ह आणि अस्वीकारार्ह आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. सर्व संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश मी दिले आहेत. या नोटिसांना उत्तर आल्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असेही पाटील यांनी पुढे नमूद केले.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या आदेशानंतर पक्षाचे नगरमधील निरीक्षक अंकुश काकडे यांनी संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावून पक्षश्रेष्ठींपुढे खुलासा करण्यास सांगितले आहे.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज