अ‍ॅपशहर

आता लक्ष्य ठाणे-दिवा!

उपनगरीय मार्गावरील बिघाडांचे प्रमाण दोन वर्षांत पूर्वीपेक्षा कमी झाल्याचा दावा करतानाच वर्षभरात सरकते जिने, लिफ्ट अशा विविध सुविधा पुरविण्याचा चंग मध्य रेल्वेने केला आहे.

Maharashtra Times 2 Jun 2016, 4:00 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई उपनगरीय मार्गावरील बिघाडांचे प्रमाण दोन वर्षांत पूर्वीपेक्षा कमी झाल्याचा दावा करतानाच वर्षभरात सरकते जिने, लिफ्ट अशा विविध सुविधा पुरविण्याचा चंग मध्य रेल्वेने केला आहे. हार्बरवरील ९ डब्यांच्या लोकल १२ डब्यांमध्ये रूपांतरित केल्यानंतर ‘मरे’कडून ठाणे-दिवा मार्गवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. दिवा येथे ऑक्टोबरपर्यंत दोन नवीन प्लॅटफॉर्म, विविध स्टेशनांवर ४७ सरकते जिने, ३७ लिफ्ट बसविण्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. मध्य आणि प. रेल्वेतर्फे ‘रेल हमसफर सप्ताहा’निमित्त आयोजित कार्यक्रमात रेल्वेच्या दोन वर्षांच्या कारभाराचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी, ‘परे’ आणि ‘मरे’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चगेट येथे एकत्रित बैठक घेत आढावा घेतला. दिवा-ठाणे मार्गाकडील अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात आल्याचे ‘मरे’चे अतिरिक्त महाव्यवस्थापक ए.के. श्रीवास्तव यांनी सांगितले. यावेळी, प. रेल्वेचे आणि मध्य रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल, विभागीय व्यवस्थापक मुकुल जैन, अमिताभ ओझा यांच्यासह अनेक ज्येष्ठ अधिकारी उप​स्थित होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new facilities on cr
आता लक्ष्य ठाणे-दिवा!


‘परे’ ९५ टक्के वक्तशीर

त्याचवेळी, ‘मरे’चे विभागीय व्यवस्थापक ओझा यांनी गेल्या दोन वर्षांतील लोकल बिघाडांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचा दावा केला. तर, ‘परे’चे महाव्यवस्थापक अग्रवाल यांनी ‘परे’ची वर्षभरातील वक्तशीरपणा ९५ टक्के असून देशभरातील सेवेच्या तुलनेत हा अव्वल क्रमांक असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, मरेवर प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या पॅनिक बटणची यंत्रणा प​श्चिम रेल्वेच्या मार्गावरही बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

४७ ठिकाणी सरकते जिने ‘मरे’ वर डिसेंबरपर्यंत ४७ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. त्यात, भांडुप, विद्याविहार, दादर, ठाणे, कल्याण आदी स्टेशनांचा समावेश आहे. सध्या ‘मरे’वर ११ सरकते जिने आहेत. तर, लिफ्टची संख्या तीन इतकीच आहे. ही संख्याही वाढविण्यात येणार असून आणखी ३७ लिफ्टची भर पडणार आहे.

दिवा येथे ‘फास्ट’ प्लॅटफॉर्म ठाण्यापुढील गर्दीचा ताण कमी होण्यासाठी दिवा येथे फास्ट मार्गावर प्लॅटफॉर्म बांधण्याची योजना आहे. त्यामुळे डोंबिवलीसह अन्य स्टेशनांवरील ताण कमी होईल. दिवा येथे ओव्हरहेड वायरचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे काही फास्ट लोकल दिवा येथे थांबणे शक्य होईल, असा विश्वास आहे. या कामासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाचेही (एमआरव्हीसी) सहाय्य घेण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज