अ‍ॅपशहर

पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर

आज गुरुवारी, अनंत चतुर्दशीला अवघा महाराष्ट्र आणि गणेशभक्त जड अंतकरणाने गणपती बाप्पाला निरोप देणार आहेत. मात्र पुढल्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार असल्याची माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Maharashtra Times 12 Sep 2019, 2:37 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganesh

आज गुरुवारी, अनंत चतुर्दशीला अवघा महाराष्ट्र आणि गणेशभक्त जड अंतकरणाने गणपती बाप्पाला निरोप देणार आहेत. मात्र पुढल्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार असल्याची माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

पुढच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी शनिवार, २२ ऑगस्ट रोजी येणार आहे. त्यानंतरच्या वर्षी शुक्रवारी १० सप्टेंबर २०२१ रोजी गणेशचतुर्थी येईल. सोमण यांनी सन २०२५ पर्यंत बाप्पांचे आगमन कधी होणार याचीही माहिती दिली. बुधवार ३१ ऑगस्ट २०२२, मंगळवार १९ सप्टेंबर २०२३, शनिवार ७ सप्टेंबर २०२४, बुधवार २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीगणेश चतुर्थी येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज