अ‍ॅपशहर

'चीनचं राहू द्या, राहुल गांधींनी आधी हे काम करुन दाखवावे'

भारत चीन सीमेवरील तणावावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांच्यावर केलेल्या टीकेला निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Oct 2020, 4:29 pm
मुंबईः आमचं सरकार असतं तर चिन्यांना १५ मिनिटांत बाहेर फेकून दिलं असतं, असं विधान करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी कधी हुशार होणार, असा सवाल करत निलेश राणे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahull gandhi


भारत- चीन सीमेवरील तणावावरून देशात सध्या राजकारण तापलं आहे. यावरूनच राहुल गांधी यांनी पंतप्रधान स्वतःला देशभक्त म्हणवतात आणि संपूर्ण देशाला माहिती आहे चीनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले आहेत. मग हे कसले देशभक्त? असा सवाल केला आहे. यावरून निलेश राणे यांनी खोचक टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या प्रोफाइलवर मोदींचा फोटो? नेमकं काय घडलं?

'राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटांत चीनला बाहेर फेकलं असतं. चीनचं राहू द्यात तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे. आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा,' असं ट्विट निलेश राणे यांनी केली आहे.


केंद्रानं POPवरील बंदी उठवावी; राज ठाकरेंनी मूर्तीकारांना दिला 'हा' धोक्याचा इशारा

'राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे. जेव्हा काँग्रेसचे ए.के अँटनी संरक्षणमंत्री होते तेव्हा चीननं भारताच्या काही भागांत घुसखोरी केली होती. पण, ए.के अँटनीनं हसत उत्तर दिलं, आमच्या चर्चा सुरू आहेत. चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. असं म्हणत राहुल गांधी कधी होणार?', असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.


रिया चक्रवर्तीचा पाठलाग करु नका, अन्यथा...; मुंबई पोलिसांचा इशारा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज