अ‍ॅपशहर

निरंजन डावखरे यांचा भाजपप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला.

Maharashtra Times 25 May 2018, 2:56 am
अनेक नेते भाजपप्रवेशाच्या रांगेत असल्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम niranjan-davkhare


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला. 'निरंजन डावखरे हे चांगले कार्यकर्ते असून त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा ते कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून येतील,' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. अनेक नेते अजून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगेत आहेत, असे संकेतही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील नेतृत्वाला कंटाळून डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत केले. समाजातील विविध क्षेत्रांतील चांगल्या लोकांना भाजपात काम करण्याची संधी मिळते. एक चांगला कार्यकर्ता म्हणून निरंजन डावखरेंना भाजपामध्ये प्रवेश दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अजून खूप लोक भाजपात प्रवेश करण्यासाठी रांगेत आहेत, त्याबाबत आताच काही बोलणार नाही, परंतु योग्य वेळ येताच ते सर्वांना समजेल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपतर्फे उमेदवारीसाठी निरंजन डावखरे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली असून ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील. निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे कोकणात भाजपला बळकटी मिळेल, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज