अ‍ॅपशहर

करोनाच्या रुग्णांची नावं जाहीर करा; मनसेची मागणी

'करोना'च्या रुग्णांची नावंं जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. हे रुग्ण म्हणजे कुणी आरोपी किंवा गुन्हेगार नाहीत. त्यांची ओळख लपवण्याची काही गरज नाही. उलट लोकांना सावध करण्यासाठी त्यांची ओळख जाहीर करावी, असं मत मनसेनं मांडलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Mar 2020, 12:46 pm
मुंबई: करोना बाधित रुग्णांना विलग करून त्यांच्यावर उपचार करताना त्यांची ओळखही लपवली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यास विरोध केला असून करोनाच्या रुग्णांची नावं जाहीर करा, अशी मागणी सरकारकडं केली आहे. जनजागृतीच्या दृष्टीनं ते अत्यंत आवश्यक असल्याचं मनसेचं म्हणणं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no need to hide identity on corona patients says mns leader sandeep deshpande
करोनाच्या रुग्णांची नावं जाहीर करा; मनसेची मागणी


वाचा: पुण्यात आणखी एक रुग्ण; राज्यात ४२ बाधित

मुंबईसह महाराष्ट्रात करोनाचा फैलाव वाढतच असून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, लागण होण्याच्या भीतीनं काही ठिकाणी करोनाच्या ग्रस्तांना व संशयितांना बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याच्या घटना पुढं आल्या आहेत. त्यामुळं खबरदारी म्हणून करोनाच्या रुग्णांची नावं जाहीर न करण्याची भूमिका सरकारनं घेतली आहे. मात्र, मनसेनं त्यास आक्षेप घेतला आहे.

वाचा: मुंबईच बंद केली तर... पंकजा मुंडेंनी सुचवला उपायundefined

वाचा: राज्यातील १७ विद्यार्थी फिलिपिन्समध्ये अडकले

'करोनाची लागण झालेले लोक हे कोणी गुन्हेगार नाहीत. त्यांना एचआयव्हीसारख्या रोगाची लागण झालेली नाही. अनावधानानं ते विषाणूच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळं त्यांची ओळख लपवण्याचं कारण नाही. उलट त्यांची नावं जाहीर केल्यास त्यातून जनजागृती होईल. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही त्याची माहिती मिळेल व खबरदारी म्हणून ते स्वत:हून चाचण्या करण्यासाठी पुढं येतील, असं मत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं. 'करोना'ला अटकाव घालण्यासाठी ते गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
वाचा: 'करोना' बळीची पत्नी, मुलगा अंत्यविधीपासून दूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज